सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले आहे. हातात तोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
शासनाकडून सातत्याने शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड अद्यापही भरून निघालेली नसतानाच पुन्हा दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून टाकले आहे.